नवी दिल्ली : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणी सपूर्ण देशभारत या प्रकरणी संतापाची लाच उसळली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी प्रत्येक जण करताना दिसत आहे. यावर विविध क्षेत्रातून सतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींना त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. मात्र गेल्या 70 दिवसांपासून धुमसलेले मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता. ते कसले विश्वगुरू ? अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे.समान नागरी कायदा आणणाऱ्यांनी आधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था निट करावी. तेवढी हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच मणिपूरही देशाचाच भाग आहे. तिथली जनता देशाचीच नागरिक आहे. तिथे महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून मारले जात आहे. ही या देशातील 140 कोटी लोकांसाठी चिंतेची गोष्ट आहे.संतप्त जमावाने मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचे घर पेटवून दिले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून जमावामध्ये बहुतांश महिला सामील असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो. पंतप्रधान किंवा भाजप स्वार्थाशिवाय काहीही करत नाहीत. आता यामागे त्यांचा काय स्वार्थ आहे हे काळच ठरवेल, असेही राऊत म्हणाले.मणिपूरच्या विषयावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा होते. पण त्याच विषयावर जर आपल्या संसदेत प्रधानमंत्री चर्चा करु देत नसतील तर ती आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे, असं राऊत म्हणाले.
Post a Comment