अपात्रता प्रकरणात नोटीसींना ठाकरे गटाकडून उत्तर नाही



मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या समक्ष असताना त्यांच्याकडून गेलेल्या नोटीसांना उत्तर न देण्याची भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतली आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसात उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र मुदत संपूनही ठाकरे गटाकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आलेले नाही. उत्तर देणे गरजेचे नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून आली आहे. विधानसभा अध्यक्ष अपात्रतेबात निर्णय घेण्यास विलंब करत असल्याचा दावा करीत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने अध्यक्षांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार अपात्र प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत उत्तर देण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. येत्या 31 जुलैला या प्रकरणातील पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे

0/Post a Comment/Comments