कल्याण : प्रसिद्ध लोक गायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेकडील कोळीवली परिसरात बांधण्यात आले. मात्र, देखभाल- दुरुस्तीअभावी याच स्मारकाची दुरवस्था झाली आहे. याबाबत आज गायक आनंद शिंदे समाजसेवक भारत सोनवणे यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. यावेळी या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे स्मारक कल्याण पूर्वेत स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी केली.आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद यावेळी आयुक्तांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देत जागेची पाहणी करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती आनंद शिंदे यांनी दिली. याच वेळी राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीबाबत तुम्ही कोणत्या गटासोबत आहात याबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी हा विषय इथे नको, वरिष्ठ पातळीवर या गोष्टी घडत आहेत, मी बोलू इच्छित नाही, माझ्या भावना सगळ्यांसोबत आहेत, अशी सावध प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडी सरकाराच्या काळात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून गायक आनंद शिंदे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करून एकनाथ शिंदे आणि भाजपने नवी यादी दिली. त्यानंतर आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या सोबत आहेत. त्यामुळे आता शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत. कोणत्या गटात ? हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यांनी माझ्या भावना सगळ्या सोबत असल्याचे सांगत सावध प्रतिक्रिया दिली.
Post a Comment