86 टक्के खरिपाची पेरणी पूर्ण
बुलढाणा : पावसाळा सुरु झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यात एक महिना उशिरा पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत 86 टक्के पेरण्या बुलढाणा जिल्ह्यात झाल्या आहेत. 7 लाख 35 हजार 521 हेक्टर शेत जमिनीपैकी आत्तापर्यंत 6 लाख 34 हजार 519 हेक्टर शेतजमिनीवर खरिपाची पेरणी झाली आहे. ज्यामध्ये 3 लाख 62 हजार 279 हेक्टर जमिनीवर वर 92 टक्के सोयाबीनचा 1 लाख 73 हजार 413 हेक्टर जमिनीवर 95 टक्के कापूस व 66 हजार 388 हेक्टर जमिनीवर 83 टक्के तुरीची शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसात विदर्भात चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला असल्याने पाच दिवस मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, अशी माहिती बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी दिली.
Post a Comment