निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात;शिवसेना नाव व धनुष्यबाण या पक्षचिन्हावर 31 जुलैला सुनावणी

 


निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी याचिका ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली होती.त्यावर आता येत्या 31 तारखेला सुनावणी होणार आहे.एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांनी गतवर्षी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. कालांतराने त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व निवडूक चिन्हही दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय निकाली निघेपर्यंत आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच पक्षातील बहुतांश सदस्य आमच्या बाजू असूनही आयोगाने शिंदेंना नाव व पक्षचिन्ह बहाल करण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेत मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला.. त्यावर उद्धव ठाकरेंनी हरकत घेतली. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले. त्यावर आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबान हे पक्षचिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय दिला.

0/Post a Comment/Comments