नाशिक :सध्या पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.त्यामुळे अनेक भाज्या महागल्या आहेत.त्यातही कोथिंबीरला शेकडा बारा ते साडेबारा हजार म्हणजे एकशे वीस रुपयांचा दर मिळत आहे.
चांदवडच्या रायपूर येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी शेत तळ्यातील उपलब्ध पाण्यावर दोन एकरात मागील महिन्यात कोथिंबीरची लागवड केली. तर त्यास दोन दिवसापुर्वी नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीला नेली असता चांगला भाव मिळाला. सध्या एक एकरातील कोथिंबीर थेट व्यापारी जागेवर घ्यायला आला. आणि एकरी एक लाख ७५ हजार अशा ठोक दराने तिची विक्री केली. दोन एकरातून त्यांना अवघ्या चार महिन्यातच लाखाचा फायदा झाला.
साधारण चांदवड तालुक्यात जम-तेम पाऊस पडल्यामुळे काही शेतकऱ्यांची पेरणीही झालेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी इतर पीक न घेता सध्या भाजीपाल्याकडे कल घेतलेला दिसत आहे. त्यामुळे त्याला आतापर्यंत भरघोस उत्पन्न मिळाल्याने शेतकरी आनंदीत आहे. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांने व्यक्त केली.
Post a Comment