( निलेश पवार )Twitter trend : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर रोज काही तरी ट्रेंड होत असतो तसेच ह्या ट्रेंडच्या माध्यमातून राजकीय ,सामाजिक, आर्थिक, व अत्याचाराच्या घटने विरोधात आणि विशेष करून सरकार विरोधात समविचारी लोक एकत्र येऊन कंटेंट पोस्ट करतात.आज १५ जून गुरुवार रोजी Indai bole BanEvm ह्या ट्रेंडच्या मोठ्या प्रमाणात कंटेंट पोस्ट करण्यात आल्यामुळे ट्विटरच्या ट्रेण्ड यादीत हा ट्रेंड झळकत होता.हजारो कंटेंट ह्या ट्रेंडचे पाहायला मिळाले evm मशीन चोर आहे निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहे अश्या पोस्ट ह्या ट्रेंड मध्ये झळकत होते.आमच्या मताची चोरी evm मशीन करीत आहे.म्हणून evm मशीन बंद करून मत पत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावी असा सूर आज ह्या ट्रेंडच्या कंटेंट मध्ये दिसत होता. भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय सयोजक वामन मेश्राम यांच्या कडून काढण्यात आलेल्या evm भांडा फोड परिवर्तन यात्रेचा देखील उल्लेख मोठ्या प्रमाणात कंटेंट मध्ये करण्यात आला होता.इतकच काय तर काही कंटेंट मध्ये थेट म्हटले आहे. की निवडणूक आयोगत हिंमत असेल तर वामन मेश्राम यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा ह्या ट्रेडला प्रचंड प्रमाणात समर्थन मिळाले आहे.बामसेफ राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे अनेक दिवसापासून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन विरोधात संपूर्ण भारतात EVM भांडा फोड परिवर्तन यात्रा चालवत आहे. निवडणूक आयोगाने येणाऱ्या २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत निवणुक प्रकिऱ्येत सुधारणार न झाल्यास संपूर्ण भारतात १५ लाख इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन फोडण्याचा इशारा वामन मेश्राम यांनी आयोगाला दिला आहे.मेश्राम यांच्या जनजागृती मुळे संपूर्ण देशातून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन विरोध होत असून मतपत्रिकेची मागणी जोरधरू लागली आहे.येणाऱ्या काळात निवडणूक आयोगाची भूमिका या संदर्भात काय असेल त्याची सर्वानाच उत्सुकता लागली आहे
Post a Comment