सहारनपूर : आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर देवबंद भागात हल्ला झाला आहे. हरियाणा क्रमांकाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी आझाद यांच्यावर गोळीबार केला. गोळी आझादच्या कमरेला स्पर्श करून गेली आहे. जखमी अवस्थेत त्यांना देवबंदच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहारनपूरचे एसएसपी विपिन टाडा यांनी सांगितले की, कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला केला. त्याचा शोध सुरू आहे. चंद्रेशखर यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
यूपीचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांचे वक्तव्यही समोर आले आहे. चंद्रेशखर आझाद यांना गोळी लागल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. कारमधील हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हे लोक हरियाणा क्रमांकाच्या वाहनाने आले होते.
चंद्रशेखर त्यांच्या फॉर्च्युनर कारने देवबंदला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अचानक कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. आझादच्या गाडीवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
या हल्ल्यात चंद्रेशखर आझाद यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.हल्लेखोर पळून जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. कारवाले हल्लेखोर बराच वेळ चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याची माहिती मिळाली आहे. संधी मिळताच त्यांनी गोळीबार करून पळ काढला.
आपल्या नेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आझाद समाज पक्षाचे वक्तव्य समोर आले आहे. देवबंदमध्ये भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला खुनी हल्ला हा बहुजन मिशन आंदोलन रोखण्यासाठी केलेले भ्याड कृत्य असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, कडक कारवाई करावी आणि चंद्रशेखर आझाद यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे
Post a Comment