सत्तेचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून चंद्रशेखरवर प्राणघातक हल्ला : अखिलेश यादव

 



लखनौ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर देवबंद, सहारनपूर येथे झालेल्या खुनी हल्ल्याचा निषेध करत हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. सत्तेचे संरक्षण मिळालेल्या गुन्हेगारांचे हे काम असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून अराजक घटकांचे मनोबल उंचावले आहे. भाजपच्या राजवटीत सार्वजनिक जीवनात सक्रिय लोकांचे जीव सुरक्षित नसताना सर्वसामान्यांचे काय होणार? असा आरोप यादव यांनी यानिमित्ताने योगी सरकारवर केला 

Post a Comment