पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईदचे सण 29 जून या एकाच दिवशी येत आहेत. मात्र पंढरपूरमध्ये बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी साजरी केली जाणार नाही असं निश्चित करण्यात आलं आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे पंढरपूरमध्ये 30 तारखेला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. आषाढीचा दिवशी येणारी बकरी ईद साजरी न करता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला कुर्बानी घेतली जाणार आहे. असे मंदिर समितीचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, मौलानांच्या आज घेण्यात आलेल्या. बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
Post a Comment