भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जळगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन


बामसेफ नावाचा गैरवापर करून खडणीं उकळणाऱ्या कमलकांत काळे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; देवानंद निकम


(जळगाव प्रतिनिधी ) जळगाव : युनिटी ऑफ मुलनिवासी या संघटनेच्या नावाखाली बामसेफ नावाचा, लोगोचा आणि रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून समाजातून मोठ्या प्रमाणावर फंड गोळा करून त्याचा गैरवापर करणाऱ्या कमलाकांत काळे याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी .तसेच ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी अशोक भाटकर यास पाठीशी घालून त्याला पळून जाण्यासाठी सहकार्य करणाऱ्या, तपासात दिरंगाई करून न्याय नाकारत फिर्यादी डॉ. विद्या नागावकर यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून फिर्यादीला संभ्रमित करणाऱ्या रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी एपीआय मनोज भोसले यांना त्वरित निलंबित करण्यात यावे . या दोन प्रमुख  मागण्यांसह  नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव , यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील डॉ धर्मकारे , लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गिरीधारी तपघाले यांच्या जातीयवादी मानसिकतेतून झालेल्या निर्घृण व अमानुष हत्या म्हणजेच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे जातीयवादी शक्तीची वाढलेली हिंमत आहे . या सर्व प्रकरणांमध्ये उचित कारवाई होऊन सबंधितांना न्याय मिळावा.  या मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर दुस-या टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले. 

महाराष्ट्र शासन व गृहखाते यांनी या संदर्भात कारवाई न केल्यास पुढील ५ टप्प्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात तीव्रस्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनाचे नेतृत्व मोहन शिंदे (राज्य महासचिव भारत मुक्ती मोर्चा),देवानंद निकम(जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा)यांनी केले.या आंदोलनात मुकुंदभाऊ सपकाळे (अध्यक्ष महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा),सुमित्र अहिरे(राज्यकर्याधक्ष्य बामसेफ),राजुभाऊ सुर्यवंशी (जिल्हाध्यक्ष RPI),विजय सुरवाडे का (बहुजन मुक्ती पार्टी) राजेंद्र खरे (जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी),सुनिल देहडे(शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),सतिष गायकवाड(समाजसेवक),अविनाश वानखेडे,प्रमोदनाना पाटील, मिलिंद सोनवणे,अशोक कोळी,खुमानसिंग बारेला,जगदीश  सपकाळे,मदन शिरसाटे,योगेश कोळी,भिका कोळी,अमजद रंगरेज, डॉ.शाकीर शेख,विनोद अडकमोल,प्रमोद सौंदळे,पाटील,अमोल कोल्हे,सुकलाल पेंढारकर,अफजल तडवी,अकील खान कासार,फहीम पटेल,निवृत्ती पाटील,भानुदास महाजन,ताराचंद भिल,निलेश बडगुजर,उज्ज्वला इंगळे,अल्का चिकणे,अनिता पेंढारकर, दिपाली पेंढारकर,द्वारकाबाई वानखेडे,योगेश निकम,विजय निकम, महेंद्र जोहरे,किरण बि-हाडे,मनोज बि-हाडे,संजय जाधव,मुकेश सावकारे,किरण महेंद्र बि-हाडे उदय बि-हाडे,पंकज तायडे,संजीव सोनवणे,आदेश लोंढे,मयुर तायडे, रविंद्र गायकवाड,संजय कदम,राजकुमार सोनवणे,रमेश वाघ,संतोष तायडे,नगराज ढिवरे,रोमल लोखंडे, हर्षवर्धन इंगळे,प्रेम चिकणे याचासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर रविंद्र भारदे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले 

0/Post a Comment/Comments