ॲड. प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबच्या कबरीला भेट

 


 

छत्रपती संभाजीनगर :  औरंगजेबचा फोटो स्टेट्सला ठेवला म्हणून कोल्हापूर येथे दंगल उसळून तणाव निर्माण झाला होता.त्यामुळे देशभर या घटनेचे पडसाद उमटत असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घटना समोर आली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवार दि. १७ जून रोजी अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे.या भेटीत त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलंही अर्पण केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसत आहे. कारण याच औरंगजेबावरुन देशासह राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीला का भेट दिली असेल ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अनेकजण दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments