प्राणायाम व योगा केल्याने आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते ; मुख्या.जे.एस.पवार
(धरणगाव प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २१ जुन रोजी जागतिक योगदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक जे. एस.पवार यांनी मुलांना प्राणायाम व योगा केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते म्हणून नियमित व्यायाम केला पाहिजे व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेतील क्रिडा व योगशिक्षक एच.डी.माळी व एस.एन.कोळी सर यांनी जागतिक योगदिनानिमित्त योगा प्रात्यक्षिक करून दाखविले. योगा व प्राणायाम याचे महत्त्व सांगितले. नियमित योगा व प्राणायाम केल्याने आपल्याला कुठलाही आजार होत नाही किंबहुना आपण आजारापासून कोसो दूर राहतो व आपले शरीरही निरोगी राहते. या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधु -भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी सक्रीय सहभाग नोंदवीला.
Post a Comment