मुंबई : सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडले आहेत. १५ आँगस्ट या स्वातंत्र्य दिनाबाबत भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
खरे म्हणजे मनोहर भिडे त्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करायला पाहिजे. कारण त्यांनी शाळेतील 15 ऑगस्ट आमचा स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज नाही आणि पुढे त्यांनी असं म्हटलं की, आपलं जे राष्ट्रगीत आहे. जन गण मन राष्ट्रगीत सुद्धा नाही. असा एवढं जर दुसरा कोणी म्हटलं असतं तर आतापर्यंत त्यांना ताबडतोब देशद्रोहाच्या गुण्याखाली अटक केली असते. संभाजी नाव स्वतःला लावायचं आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम चाललंय. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वयानुसार त्यांचा समतोल ढासळला आहे. संपूर्ण देशांमध्ये मुर्खात काढत असताना तरंग्याला अपमानित करत असताना स्वातंत्र्य दिनाला मान्य करत असताना स्वातंत्र्य सैनिकांना आपण करत असताना त्यांच्यावरती कुठलाही पुन्हा दाखल होत नाही. त्याच्या मनामध्ये प्रचंड जातीयवाद, प्रचंड धर्मद्वेष भरलेला आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील केली आहे.
Post a Comment