वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळाची गरज - जनार्दन पवार [मुख्याधिकारी प्रशासक न.पा.]
(धरणगाव प्रतिनिधी) : धरणगांव ५ जुन पर्यावरण दिनी धरणगांव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध कॉलनी परीसरात २५० वृक्षांचे लागवड करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे मार्गदर्शनाखाली न.पा.चे आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, शहर समन्वयक निलेश वाणी, सफाई कर्मचारी व कॉलनीवासीयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगर परिषदेने १० वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये गुलमोहर, चिंच, लिंब अशा विविध वृक्षांचा समावेश आहे. व वृक्ष संवर्धनासाठी १५ ट्री गार्ड लावण्यात आले.कॉ
लनीवासी पी डी पाटील यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शहर समन्वयक निलेश वाणी यांनी केले. याप्रसंगी आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, सफाई कर्मचारी नरेंद्र बिवाल, गौरव पचेरवाल, सागर पचेरवाल, सुजीत वाघरे, महेश चौधरी, संदीप करोसिया कृष्णा गीता नगर कॉलनीचे अध्यक्ष बी.एम.सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी , सचिव महेंद्र सैनी, प्रल्हाद विसपुते, बाळु अत्तरदे, पंकज मिस्तरी, गोकुळ महाजन सर्व कॉलनिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्ण गीता नगर कॉलनीवासीयांनी नगर परिषदेचे आभार व्यक्त केले.
Post a Comment