बाळासाहेबांची भूमिका आम्हांला सांगू नका'' समान नागरी कायद्यावर राऊत म्हणाले

 


मुंबई : केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. भाजपकडून या कायद्यावर विरोधकांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच ठाकरे गटाच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याच्या बाजूने भूमिका मांडली होती.

समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते शिंदे गटाविषयी बोलतांना ते म्हणाले की, कुठल्या गटाने समर्थन दिलं माहिती नाही. तो गट बेकायदेशीर आहे, त्यामुळे ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. हा विषय राष्ट्रीय ऐक्याचा आहे, एका देशात दोन कायदे बोलायला ठीक आहे. समान नागरी कायदा म्हणतायत मग देशात चार-चार कायदे चालले आहेत, त्याचं काय?

संजय राऊत पुढे बोलतांना म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी तुमच्या माणसांना वेगळा कायदा बाकीच्यांना वेगळं कायदा, असं का? या कायद्यान्वये समाजाचा मुद्दा येतो हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही येत. हा मुद्दा राष्ट्रीय एकतेचा आहे. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट बनवला जातोय प्रत्येक राज्य विधानसभा निवडणूक पाहून ड्राफ्ट बनवत आहेत. एकदा ड्राफ्ट बनला की चर्चा करू.

सर्वांना समान कायदा हवायावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, कायदा कोणताही असो सर्वाना समान हवा. बाकीच्या पक्षातील लोकांना वेगळा कायदा आणि स्वपक्षातील लोकांना वेगळा कायदा, हे चालणार नाही. बाळासाहेबांची भूमिका आम्हाला सांगू नये, सर्व कायदे सर्वांना समान हवेत. समान नागरी कायद्याबाबत आमच्या पक्षाची चर्चा होईल. लॉ कमिशन समोर आठशे प्रश्न आले आहेत, समितीमध्ये आमचे तीन सदस्य आणि इतर सदस्य आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments