विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला १,१११ रु. ची दिली देणगी



(धरणगांव प्रतिनिधी)  धरणगांव : धरणगाव शहरात लहान माळीवाडा परिसरामध्ये माळी समाज पंचभवनाचे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे.लहान माळीवाडा परिसरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक राहतात आणि या सर्वांसाठी माळी समाजाच्या वतीने प्रशस्त तीन मजली इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.या धर्मनिरपेक्ष समाजोन्नतीच्या व्यापक कार्यासाठी माझाही थोडा हातभार लागावा व खारीचा वाटा उचलावा या सामाजिक उत्तरदायित्वातून सुतार समाजाचे सेवानिवृत्त उपशिक्षक,सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव संस्थापक प्रमुख विजय लुल्हे ( जळगाव ) यांनी पूज्य पिताश्री स्व.सुपडू नथू सुतार [ निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक ] यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माळी समाज पंचभवन ला १,१११ रुपयाची देणगी रोख स्वरूपात दिली.

याप्रसंगी माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, सचिव दिपक महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, पंच व नगरसेवक विलास महाजन,लुल्हे सरांचे सन्मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र महाजन [ धानोरा ता.चोपडा ] , तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ,सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख आदी मान्यवर समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments