मानवी मूल्यांची जोपासना करणारे राजर्षी सर्वोत्तम राजे होत ; मुकुंद सपकाळे

 


जळगाव : मानवी कल्याणाचा ध्यास आणि मानवी मूल्यांची जोपासना करत असताना सामान्यातल्या सामान्य माणसाला सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी आपल्या संस्थानात स्वातंत्र्याची पेरणी करणारे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने तरुणांचे आदर्श असले पाहिजे असे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष तथा भारत जोडो, महाराष्ट्र जोडो अभियानांतर्गत आयोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले भारतीय लोकशाहीमध्ये आज माणूस सत्तेत असणे ऐवजी पक्षाची भूमिका पक्षाचा विचार लादला जात असल्याने भारतीय लोकशाही महामानवांच्या विचारापासून दूर नेण्याचे राज्यकर्त्यांकडून चाललेले दिसत असून लोकशाही धोक्यात आल्याचे सुद्धा त्यांनी याप्रसंगी मांडले. लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी धर्मापेक्षा राष्ट्रनिष्ठा जोपासणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज हे सर्वश्रेष्ठ राजे असून मानवी कल्याणाचा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी विकासासाठी आपल्या आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न करीत शाहू महाराजांनी रयतेसाठी केलेले राज्य सर्वोत्तम राज्य संकल्पना असल्याचे लक्षात येते त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये अंगीकारत जीवनाची वाटचाल करण्याचे देखील आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.  डॉ. करीम सालार डॉ. मिलिंद बागुल, सुरेंद्र पाटील,सुरेश पाटील, ज्योतीताई पाटील यांनी आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले कार्यक्रमास राम पवार, दिलीप सपकाळे,सुरेश पाटील, रमेश सोनवणे, संजय सपकाळे,भरत कर्डीले, भवराव इंगळे,प्रमोद पाटील, सोमा भालेराव फईम पटेल,सुधाकर पाटील,पंकज सोनवणे,नाना ठाकरे, हरिश्चंद्र सोनवणे,योगेश पाटील विनोद सपकाळे,आधार सपकाळे, सुरेंद्र चव्हाण, सचिनभाऊ धांडे, अमोल कोल्हे, विजयकुमार मौर्य,अनिल सुरडकर, प्रतिभा शिरसाठ, जयसिंग  वाघ, जगदीश सपकाळे, सूर्वे,आनंदा तायडे,योगेश कोळी,यशवंत घोडेस्वार, विनोद रधे, युवराज सुरवाडे, चंदन बिराडे, सतीश पाटील, जयेश वाल्हे,महिंद्र केदार व अनेक मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments