अपघातातून वाचलेल्या गरीब रुग्णांने मानले आमदाराचे आभार
(धरणगाव प्रतिनिधी ) : अडावद ता.चोपडा येथील सोमनाथ निकम व त्याची आई मीराबाई निकम याचा मोटरसायकल वर अपघात झाला होता. चोपडा येथील मोरया हाँस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यावर जळगाव येथील नहाटा हाँस्पिटलमध्ये दाखल केले असता पायाचा चेंदामेंदा झाला होता. म्हणून डॉक्टरांनी अडीच ते तीन लाख रूपये खर्च लागेल असे सांगितले. नाहीतर पाय तोडावा लागेल असे सांगितले परिस्थिती बेताची असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जळगाव चे कार्यसम्राट आमदार सुरेश भोळे ( राजूमामा भोळे ) यांनी तात्काळ एक लाख रूपये निधी मंजूर करून दिला. त्यामुळे आँपरेशन यशस्वी झाले. असाच तीन ते चार कोटींचा निधी त्यांनी गरीब रूग्णांना मिळवण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून त्यांचे व मुख्यमंत्री सहाय्यक निधी समितीचे रूग्णांंनी शतशः आभार मानले.
फॉर्म भरण्यासाठी रुग्णालयातील सोपान पाटील आणि सुदर्शन पाटील सर यांनी मदत व मार्गदर्शन केले सिव्हिल सर्जन डॉ. किरण पाटील साहेब यांनी क्षणाच्या विलंब न करता कॉउंटर सिग्नेचर केली हे सर्व करण्यासाठी रुग्णाचे मामा सुधाकर मोरे सर यांनी आठ दिवसअथक परिश्रम घेतले
Post a Comment