शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा धरणगावात शुभारंभ


 दिव्यांगांना 101 तीन चाकी बाईक देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील


(धरणगांव प्रतिनिधी) : धरणगाव येथे दिनांक 16 जून रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी शासनाच्या विविध योजना संदर्भात मार्गदर्शन करून आता जनतेला कुठेही फिरण्याची गरज नसून विविध शासकीय योजनेचा लाभ कागदपत्रे उत्तारे, जन्म,मृत्यूचे दाखले आता यापुढे घरपोज मिळतील दिव्यांगांसाठी त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनामार्फत 101 दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी बाईक देण्यात येऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल कोणताही अधिकारी आपले वेळेवर काम करत नसेल आपल्याला त्रास होत असेल तर मला वैयक्तिक फोन करा शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखले शालेय विद्यार्थ्यांना बूट,बॅग,गणवेश वाटप शिधापत्रिका वाटप विवाह प्रमाणपत्र,कुटुंब लाभ योजना अंतर्गत 51 लाभार्थ्यांना एक लाख 20,000 चे धनादेश एनओसी दाखले गोल्डन कार्ड कुटुंबा फळांच्या झाडाचे वाटप माहिती पुस्तिका अशा विविध शासकीय योजनांचे कागदपत्रे देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब, उपजिल्हाधिकारी आरती चव्हाण, गटविकास अधिकारी सुशांत पाटील,एरंडोल धरणगाव प्रांत मनीष कुमार गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रदीप चव्हाण,धरणगाव नगरपालिका संजय मिसर,आरोग्य अधिकारी डॉ.छाया बोरसे,शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी सुभाष अण्णा पाटील,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,चंद्रशेखर अत्तरदे, गजानना पाटील,मुकुंद भाऊ नन्नवरे,जिजाऊराव पाटील,पप्पूभाऊ भावे, कैलास माळी सर,दिलीप भाऊ महाजन,विलास भाऊ महाजन,कन्हैया रायपूरकर,भैयाभाऊ महाजन,रवींद्र कंखरे, हेमंत चौधरी,वाल्मीक पाटील,प्रशांत देशमुख, चंदनभाऊ पाटील,शिरीष आप्पा बयस,ललित येवले, संतोष महाजन,नवल राजे पाटील,प्रेमराज बापू पाटील,चेतन पाटील,चेतन जाधव, महिला आघाडीच्या सौ भारतीताई चौधरी, मायाताई सोनवणे,रेखा पाटील,सुनीता पाटील, प्रिया इंगळे तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार महिला बचत गटाच्या महिला विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.

0/Post a Comment/Comments