भीम जयंती साजरी केली म्हणून तरुणाचा चाकू बोकसून हत्या
(बोंढार हवेली,नांदेड प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती गावात पहिल्यांदाच साजरी केली म्हणून जातीवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव ह्या बौध्द तरुणाचा निर्घुण पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.नांदेड जिल्ह्यातील बोढार हवेली गावात पहिल्यांदा अक्षय भालेराव या तरुणाचा पुढाकाराने भीम जयंती साजरी करण्यात आली होती.भीम जयंती साजरी केल्याचा द्वेष भावनेतून गावातील जातीवादी गावगुंडांनी गुरुवार रोजी विकृत मानसिकतेतून अक्षयला एकटे पाहून हल्ला करण्यात आला.यावेळी अक्षय भालेराव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यावर चाकूने रपारप वार करण्यात आले उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना अक्षयचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.रुग्णालयात अक्षयला आणले असता डॉक्टरांनी तपासणी केलावर मृत घोषित केले.अक्षय भालेरावच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्यात आली असून त्यांना देखील उपचारासाठी रूग्णांना दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध हत्या आणि अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने बोंढार हवेली गावासह संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त करण्यात येत आहे.घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .दरम्यान या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध हत्या आणि अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .
Post a Comment