अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या जनआक्रोश मोर्चाची मागणी





(जळगाव प्रतिनिधी)  जळगाव : नांदेड जिल्ह्यातील   बोंडार हवेली या गावात आजपर्यंत आंबेडकर जयंती साजरी झालेली नव्हती . तरी अक्षय भालेराव या आंबेडकरी युवकाने सर्व जाती धर्माच्या लोकांना जागृत करून आंबेडकर जयंती साजरी केली याचा राग मनात ठेवत जातीवादी मानसिकतेच्या 10 15 गावगुंडांनी एकत्र येऊन अक्षय भालेरावला मारहाण करून त्याची निर्घृणपणे अमानुष हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्यावतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन जवळच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. नेहरू चौक , टॉवर चौक, चित्रा चौक , कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे  आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनात प्रामुख्याने पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या. अक्षय भालेरावची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व मारेकऱ्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा व आरोपींना त्वरित  फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अक्षयच्या कुटुंबातील एक व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत जगणाऱ्या भालेराव कुटुंबाला शासनाने त्वरित 50 लाखाची मदत केली पाहिजे. ॲट्रॉसिटी ॲक्टची  अंमलबजावणी करून आरोपींना तात्काळ शासन झाले पाहिजे . या काळात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अक्षय भालेराव खून खटल्यात शासनाने एसआयटी चौकशी नेमून हत्त्याचा मुख्य सूत्रधार याला तात्काळ जेरबंद करावे. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावर नियमित होणारे अन्याय अत्याचारात बोटची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा या मोर्चाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला. 

या मोर्चात मुकुंद सपकाळे , राजू सूर्यवंशी , सतीश गायकवाड , करीम सालार , विजय सुरवाडे , दिलीप अहिरे , सुरेश सोनवणे , दिलीप सपकाळे , जगन सोनवणे , सुमित्र अहिरे , अमोल कोल्हे , धुडकू सपकाळे , सुनील देहाडे , समाधान सोनवणे , अजय गरुड , सचिन धांडे , फारुख शेख , संदिप ढंढोरे , साहेबराव वानखेडे , निलू इंगळे , विनोद रंधे , मिलिंद सोनवणे , राजू मोरे , जगदीश सपकाळे , पंकज सोनवणे , राजू सवरणे , उमेश गाढे , सुरेश तायडे , दत्तू सोनवणे , नारायण सोनवणे , भारत सोनवणे , प्रतिभा शिरसाठ , शारदा इंगळे , महेंद्र केदारे , फईम पटेल , संजय सपकाळे , जितू सोनवणे , सचिन बिऱ्हाडे , लता बाविस्कर , गोपाळ डोंगरे , राधे शिरसाठ , चेतन नन्नवरे , शांताराम अहिरे , गोविंदा पवार , गुलाब कांबळे , शाम संधानशिवे , नितीन अहिरे , दादाराव शिरसाठ , रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments