(धरणगाव प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाज सुधारक, आरक्षणाचे जनक, कोल्हापूर संस्थांनचे लोककल्याणकारी राजे, सत्यशोधक, छत्रपती, राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर वर्ग पाचवी ते वर्ग नववी पर्यंतचा वार्षिक निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप करण्यात आले. पी.डी.पाटील यांनी आरक्षणाचे जनक, मोठ्या दिलाचा राजा, लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एन.कोळी व आभार व्ही.टी.माळी यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Post a Comment