मांदुर्णे गावात सत्यशोधक समाज संघाचे " प्रबोधन शिबिर " उत्साहात संपन्न

 

आधुनिक भारताचे शिल्पकार सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले ; सत्यशोधक अरविंद खैरनार


यापुढे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करणार ; दगडू पाटील सरपंच 


(चाळीसगाव प्रतिनिधी) चाळीसगाव : तालुक्यातील मांदुर्णे  गावी सत्यशोधक समाज संघाचे शतकोत्तर सुवर्ण वर्ष , ११ मे महात्मा दिन व १४ मे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून प्रबोधन शिबिर उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक गावाचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक राजाराम सखाराम पाटील होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन गावाच्या सरपंच सौ. सुनंदाबाई दगडू पाटील व दगडू गणपत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले.या प्रबोधन शिबिराचे प्रमुख वक्ते सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य भूषण पाटील,  सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक कैलास जाधव, विधीकर्ते भगवान रोकडे, गोविंद वाघ, जयराम आप्पा उपळकर, सायगाव चे सरपंच रमेश वामन माळी, उपसरपंच गोकुळ रामराव माळी, सदस्य दिनेश माळी, उपखेडचे सरपंच प्रभाकर मगर, उपसरपंच सुरेश पाटील, मांदुर्णेचे उपसरपंच गोरख पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस पाटील भारती विष्णू पाटील उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे महापुरुषांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सर्वप्रथम गावातील धर्मराज पाटील, राजेंद्र पाटील, दीपक वेळीस, गौतम खैरे, शिवाजी महाजन यांनी खंडेरायाची तळी उचलून प्रबोधन शिबिराची सुरुवात करण्यात आल. उद्घाटनीय मनोगतात गावाचे सरपंच दगडू पाटील यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य करून समस्त बहुजनांचा उद्धार केला. तात्यासाहेबांचे विचार आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. यापुढे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करणार असे प्रतिपादन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरविंद खैरनार यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सांगून सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य तसेच शेतीविषयक धोरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिवजयंतीचे खरे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आहेत. सत्यशोधक समाज संघ शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी लढणारे संघटन आहे. स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराजांसारखे राजे होणे नाही त्यांनी आपल्या जीवनात असंख्य लढाया लढल्या व जिंकल्या सुद्धा दिल्लीचा तक्त हलविणारा प्रजावत्सल, न्यायप्रिय राजा म्हणजेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज होय. शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच आपल्याला तारतील असे प्रतिपादन खैरनार यांनी केले. या प्रबोधन शिबिराला गावातील ग्रामस्थ माता-भगिनी, युवक - युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद पाटील व आभार महेश भावसार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत मांदुर्णे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, दगडू उत्तम पाटील, विकास पाटील, पंकज पाटील, वासुदेव पाटील, तुषार पाटील मांदुर्णे येथील ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी अनमोल सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments