महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

 

(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधून शाळेतील सेवक अशोक निळकंठ पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, पर्यवेक्षक एम बी मोरे तसेच सर्व शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments