(धुळे प्रतिनीधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राजीनामा देऊन निवृत्तीची घोषणा केली. सदर निवृत्तीची घोषणा व राजीनामा मागे घ्यावा यासाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करून राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
शरद पवार साहेब हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या विचारावर कार्यकर्ता काम करीत असतो. शरद पवारांकडे बघून पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करीत आहे, पवार आपणच जर निवृत्तीची घोषणा केली, तर कार्यकर्ते कोणाच्या कडे बघून काम करतील. पक्षातील सर्व तरुण पदाधिकारीच्या पाठीमागे कोण उभा राहील.तुम्ही आहात म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कर्मचारी, मजूर, महिला, तरुण हे मोठे अपेक्षाने आपल्याकडे बघत आहेत. महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा प्रामाणिकपणे काम करणारे आपण आहात.तुम्ही निवृत्तीची घोषणा केलीस आमचं कसे होईल? अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ उभे राहून घोषणा देत होते.यावेळी रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, गोरख शर्मा, रईस शेख, मंगेश जगताप, भालचन्द्रं पाटील, पाटील सर, भिका नेरकर, भानुदास लोहार, रईस काझी, राजेंद्र चितोडकर, राजेंद्र सोलंकी, महेंद्र जगताप, महेंद्र बागुल, राजेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाठ, उमेश महाजन, सलीम शेख, अमीन शेख, समद शेख, सोनू घारू, नजीर शेख, शोयब अन्सारी, वाल्मिक मराठे, नारोद्दिन शहा, विशाल केदार, चेतन पाटील, रामेश्वर साबरे, निलेश चौधरी, सागर चौगुले, प्रसाद दाळवाले, अझर पठाण, ऋतिक पोळ, जुनेद शेख, राहुल पोळ, प्रशांत पाटील, मंगला मोरे, स्वामिनी पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment