(धुळे प्रतिनिधी) : धुळे शहरापासून जवळच असलेल्या नकाणे तलाव परिसरात एका गोठ्यात 8 फूट विशाल असा अजगर आठळून आला आहे. या अजगराला सर्पमित्रांनी पकडुन वनविभागाच्या साह्याने लळिंग कुरणार सुखरूप सोडले आहे या अजगराला पाहण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.
तलाव परिसरात बारकु वाघ यांच्या गोठ्यात हा अजगर आढळून आला आहे. तरी अजगरांना चक्क दोन शेळ्या गिळून घेतल्याचे दिसून आले.तर या शेळ्यांचा मृत्यूही झाला आहे.त्यांनी आरडाओरड केली आसता जवळील लोकांची गर्दी झाली तर त्यांनी 29 एप्रिल ला तत्काळ जवळील सर्पमित्र दुर्गेश जाधव,वेदांत बहाळकर, विशाल महाले यांना सपंर्क करून बोलावले , सर्पमित्र लवकरच पोहचले. सर्पमित्रांनी बगितले सता त्यांना अजगर जातीचा सर्प असल्याचे समजले. त्यांच्या सुमारे एक तासाच्या परिश्रमानंतर सर्पाला सुरक्षितपणे पकडले .त्यांनी सांगितले हा अजगर जातीचा बिनविषारी साप असून हा सर्प भक्ष्याच्या शोधात आला आहे . हा साप सुमारे १० फुटाचा होता असेही त्यांनी सांगितले
सदर अजगराला सर्पमित्र दुर्गेश जाधव, हर्षल फुलपगारे , विशाल महाले, मयूर गोसावी यांनी वन विभागाच्या सहाय्याने महेश पाटील वनशेत्र पाल (RFO) , नितीन देवरे वनपाल.यांच्या साह्याने लळिंग कुर्णात सुखरूप सोडले आहे
Post a Comment