(प्रतिनिधी चाळीसगांव) : चाळीसगांव तालुक्यातील मांदुर्णे येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे " ११ मे - महात्मा दिन " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता - सत्यशोधक - तात्यासाहेब जोतीराव गोविंदराव फुले यांच्या महान सामाजिक, शैक्षणिक क्रांतिकार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मुंबईच्या कोळीवाड्यात रावबहादुर वड्डेवार, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या उपस्थितीत अठरा पगड जातीच्या सर्व जनतेने व सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे ११ मे १८८८ रोजी " महात्मा " पदवी देऊन सार्थ जोतीरावांच्या कार्याचा गौरव केला.
परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासातील असा हा सोन्याचा दिवस आहे. " महात्मा दिन " संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आधुनिक भारताचे जनक तसेच स्त्री शिक्षणाचे जनक - क्रांतीसुर्य - सत्यशोधक - तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याला त्रिवार वंदन करून मांदुर्णे गावाचे माजी सरपंच छगन नारायण पाटील, माजी उपसरपंच सुरेश राजाराम पाटील यांच्या शुभहस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी गावातील माजी सरपंच दगडू आत्माराम पाटील, ज्येष्ठ नागरिक विक्रम सदा पाटील, धर्मराज पुंडलिक पाटील, प्रभाकर आधार पाटील, संजय बापू पाटील, दगडू पाटील, महेश भावसार, वासुदेव पाटील, तुषार पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक प्रमोद पाटील तसेच मांदुर्णे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment