(धरणगाव प्रतिनिधी) : धरणगाव येथे महाराष्ट्र सरकारचा सत्तासंघर्ष निकाल ठाकरे गटाचा बाजूने लागावा यासाठी शहरतील तेली तलावाजवळील सिद्धी हनुमान मंदिरात अभिषेक व आरती करून साकडे घातले.यावेळी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख ऍड. शरद माळी,शहर प्रमुख भागवत चौधरी ,नगरसेवक जितेंद्र धनगर,वासुदेव महाजन यांचा हस्ते आरती व भजन करण्यात आले. पुरोहित यांच्याकडून शास्त्रपद्धतीने अभिषेक करण्यात आला यावेळी उपस्थित उपशहर प्रमुख रवी जाधव, छोटू चौधरी, व्यापारी सेना शहर प्रमुख दिनेश येवले , रणजित चव्हाण गोपाल चौधरी , वासू महाजन कृपाराम महाजन किरण अग्निहोत्री युवा सेना सचिव राहुल रोकडे सतोष सोनवणे , गोपाल महाजन , गणेश महाजन, प्रेमराज चौधरी रवी आहिरे रुपेश अमृतकर भिमराव धनगर , सागर ठाकरे अरविद चौधरी, राकेश चौधरी, विनोद रोकडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment