(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्या वतीने ११ एप्रिल - भारतातील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९६ जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते माळी समाज मढी मध्ये संत शिरोमणी सावता महाराज, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सचिव गोपाल माळी, सहसचिव दिगंबर माळी, कोषाध्यक्ष व्ही टी माळी, समाजाचे विश्वस्त विजय महाजन, माजी सचिव दशरथ महाजन, संतोष महाजन सल्लागार पंच एच डी माळी, पी डी पाटील, राजु महाजन, कांतीलाल महात्मा, कैलास माळी, तसेच समाजातील ज्येष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक - सूत्रसंचालन समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी तर आभार सचिव गोपाल माळी यांनी मानले.
Post a Comment