सत्यशोधक समाज संघाच्या वतीने धरणगाव तहसिल ला निवेदन


११ एप्रिल, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करावी; सामाजिक व राजकीय संघटनेचा पाठिंबा


धरणगाव : प्रतिनिधी 


धरणगांव : संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह प्रशासकीय सेवेत कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाला एकाच वेळेस निवेदन सादर करण्यात आले.या अनुषंगाने तहसील कार्यालय धरणगाव येथे विविध सामाजिक - राजकीय संघटनांनी एकत्रित येऊन "११ एप्रिल सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी" याबाबत धरणगाव तहसिलचे सुनील पानपाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.

 प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांना मानण्यात अर्थात गौरव करण्यात येतो. तात्यासाहेबांनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य भारतातच नाही तर विश्वात रुजविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य हे सकल विश्वासाठी, भारतीयांसाठी प्रेरणादायी व ऊर्जादायी आहे म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत  आम्ही दिलेले निवेदन पोहोचवावे असे प्रतिपादन तहसिल येथे निवेदन सादर प्रसंगी केले. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, माळी समाजाध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते तहसिलचे अधिकारी सुनिल पानपाटील यांना निवेदन देण्यात आले. 

सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मोत्सव (दि.११ एप्रिल) यादिनी शासकीय सुट्टी जाहीर केल्याचा आदेश काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही (घोषित) करण्यासंदर्भात  सकल माळी समाज, शिवसेना उ.बा.ठाकरे, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, बहुजन क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, धरणगाव तालुका पत्रकार संघ, अखिल भारतीय सावता माळी युवक संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या सर्व संघटनांनी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

निवेदन सादर प्रसंगी महात्मा फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक तथा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, पत्रकार विकास पाटील, पत्रकार जितेंद्र महाजन, पत्रकार प्रमोद पाटील, माहिती अधिकार कायदा महासंघ तालुकाध्यक्ष सतिष शिंदे, शहराध्यक्ष निलेश पवार, सरपंच अरुण शिरसाठ, राष्ट्रीय किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष नगर मोमीन, हसन मोमिन, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे महेंद्र तायडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र महाजन, काँगेस कमिटीचे उपशहराध्यक्ष नंदलाल महाजन, रामचंद्र माळी, अखिल भारतीय संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक महाजन, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल माळी, डिगंबर माळी, एच डी माळी, रविंद्र बाविस्कर, नितेश माळी, एम बी मोरे, एस एन कोळी, ॲड. रविंद्र गजरे, किशोर माळी, राकेश गजरे, संतोष महाजन, जितेंद्र गजरे, एस आर महाजन, दीपक महाजन, शिपाई कैलास माळी यांच्यासह आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments