अक्कलकुवा तालुक्यातील कोराई सह वाण्याविहीर परिसरात राजरोसपणे बनावट ताडी विक्री चा गोरखधंदा सुरू ताडी विक्रेत्यांची मुजोरी वाढली

 


पोलिसांची बघ्याची भूमिका ; व्यसनाधीन तरूणांचा मृत्यू होत असल्याची परिसरात चर्चा


(अक्कलकुवा प्रतिनिधी) : अक्कलकुवा तालुक्यातील खापर व कोराईत बनावट ताडी विक्री सुरू असल्याने अनेक व्यसनाधीन तरूण या बनावट ताडीचे बळी पडत आहेत.काही दिवसांपूर्वी बनावट ताडी संदर्भात विविध वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्याने खापर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली होती..मात्र काही दिवस उलटताच परिस्थिती जैसे थे झाली.कोराई या गावात ताडीच्या आहारी गेलेले तरूण सुजून फूगून मृत्यू मूखी पडत आहेत.या बाबत कोराई येथील माजी सरपंच यांनी तालुका व जिल्हास्तरावर पत्रव्यवहार देखिल केला होता.मात्र यावर काहीही कारवाई न झाल्याने शेवटी पाणी कुठे मुरत आहे.याचा शोध लागणे गरजेचे झाले आहे.काही दिवसांपूर्वी परिसरात खापर येथिल पोलिसांनी खापर,कोराई व परिसरातील परप्रान्तीय बनावट ताडी विक्रेते व स्थानिक विक्रेतांवर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्यामूळे परिसरातील लोकांनी हा व्यवसाय बंद झाल्याने वृत्तपत्रांचे  कौतुक केले होते.अनेक वर्षापासून हा अवैध व्यवसाय सुरू आहे..या ताडीने अनेक तरूणांचे प्राणही घेतल्याचे परिसरातून बोलले जात आहे.व आजही घेतले जात आहे.अजून किती लोकांचे बळी जाण्याची वाट संबंधित प्रशासन पाहत आहे?असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.

 अक्कलकुवा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल सातपूड्याच्या द-याखो-यात वसलेला दुर्गम अतिदुर्गम पाश्वभूमी असलेला तालुका असल्याने अवैध व्यवसायांचा अड्डाच बनलेला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 अक्कलकुवा तालुक्यात परप्रान्तातून आलेल्या लोकांकडून जागोजागी बनावट ताडीची दुकाने थाटलेली दिसून येतात.तालुक्यात ताडीची झाडे नसतानाही बनावट ताडी सर्रास विकली जात होती..कोणताही परवाना नसताना हा प्रकार सुरू असून तालुक्यात खापर परिसरात व गुजरात राज्याच्या हद्दीच्या जवळपास परप्रांन्तीयांकडून ताडीची विक्री राजरोसपणे सुरू होती..त्यामूळे परिसरातील तरूणांच्या आरोग्यावर या बनावट ताडीचे गंभिर परिणाम होताना दिसत आहेत.अक्कलकुवा तालुक्यात ताडीची झाडे नसुनही बोगस बनावट ताडी विकली जात होती.विविध रसायनांपासून तयार केल्या जाणा-या ताडीमूळे आरोग्यावर दुरगामी विपरीत परिणाम होतात..व वेळप्रसंगी अतिसेवनाने मृत्यू ही होत आहेत.यावर परिसरात कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी . अशी मागणी केली जात आहे.अन्यथा नाशिक विभागीय   पोलिस अधिकारी यांना याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यात ताडीची झाडे नाही च्या बरोबरीनेच आहेत.त्यामूळे विविध रसायनांचा वापर करून ताडी बनवली जाते.ती सर्रास ताडीच्या नावाखाली विकली जाते.अतिशय कमी खर्चात ही ताडी तयार होते .स्वस्तात नशा करायला मिळत असल्याने तरूण व मजूरवर्ग याकडे आकर्षित झाला आहे.रसायनांमूळे अनेकांचे चेहरे काळे पडले आहेत तसेच शरिर सूजू लागते.व हळूहळू अनेक अवयव निकामी होतात .त्यात प्रामुख्याने किडनीचे विकार व लिव्हरचे आजारांना ताडीच्या आहारी गेलेला व्यक्ती बळी पडतो.

0/Post a Comment/Comments