(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. तत्पूर्वी उपस्थितांनी जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
सविस्तर माहिती अशी की, आज रोजी कुणबी पाटील समाज पंचमंडळ बैठकीचे आयोजन समाजाच्या सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीत शैक्षणिक व विविध विषयासंदर्भात पंचमंडळाची विस्तृत चर्चा झाली.
याप्रसंगी समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचातूर्याच्या जोरावर, प्राविण्य प्राप्त केले असुन त्यांची केंद्र सरकारच्या भारतीय रेल्वेमध्ये निवड झाली आहे. भारतीय रेल्वे सेवेत झालेल्या निवडीबद्दल अध्यक्ष व पंच मंडळाच्या वतीने विशाल ज्ञानेश्वर पाटील, खुशाल सुरेश पाटील, नंदकिशोर मोहन शिंदे, अजय ज्ञानेश्वर पाटील, वासुदेव भिकन पाटील या सर्व यशवंतांचा शाल, पुष्पगुच्छ व अनमोल ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष नाना सजन पाटील, उपाध्यक्ष दिपक जयराम पाटील, खजिनदार राहुल राजेंद्र पाटील, सेक्रेटरी तुकाराम महादू पाटील यांच्यासह पंचमंडळ व समाज बांधवांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन व कौतुक केले.
Post a Comment