शहरातील विविध भागासह हनुमान नगरात हनुमान जयंती उत्साहात साजरी


धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव : येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा,रामायण पारायण,धार्मिक कार्यक्रम,भजन,कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील विविध मंदिरासह हनुमान नगर येथे गुरुवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

हनुमान जयंतीनिमित्त शहरातील हनुमान नगर, मोठा माळी वाडा, अंजनी हनुमान, परिहार चौक,आदी भागातील मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती.सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. शहरात हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते.सकाळी रुद्राभिषेक, दुपारी जन्मोत्सव तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या संगीतमय हनुमान चालिसा पठण सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.हनुमान नगरात जयंतीच्या निमित्ताने हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी दिपक वाघ, समाधान वाघ, कन्हैया महाजन, निलेश महाजन, राहुल महाजन, समाधान मराठे, सुनील लोहार, रविंद्र वाणी, गोलू मराठे, शांताराम महाजन,गणेश चौधरी, योगेश महाजन, महेंद्र पाटील, राकेश मराठे, गोलू न्हावी, विनोद चव्हाण, राकेश मराठे, आप्पा महाजन, अमोल महाजन, भैय्या महाजन, संदीप मराठे, प्रविण गुरव, पिंटू महाजन, घनशाम पाटील, महेश मराठे, दिपक महाजन, रावसाहेब मराठे, गणेश महाजन यांसह महिलावर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते.हनुमान नगर मित्र मंडळातर्फे हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.

0/Post a Comment/Comments