डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव येथे दि.१२ एप्रिल रोजी रंगणार सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गीतांची मैफल



(चाळीसगाव प्रतिनिधी) : भारताला संविधानाची भेट देणारे विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपूर्ण तालुक्यात सर्व समाजघटकांना सोबत घेऊन व्यापक प्रमाणात साजरी व्हावी यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.या समितीच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीते व सदाबहार गीतांचा कार्यक्रम बुधवार दि.१२ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान, चाळीसगाव येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

तरी चाळीसगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments