(धुळे प्रतिनिधी) धुळे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त देवपुरातील सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्याजवळ भव्य भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे आयोजन उपमहापौर नागसेन बोरसे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून भीमगीतांच्या कार्यक्रमास सुरूवात करन्यात आली.
प्रसिध्द गायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे व कडूबाई खरात यांच्या भिमगितांच्या गाण्यावर उपस्थित नागरिक चांगलेच मंत्रमुग्ध झाले होते. या गाण्यामुळे नागरीकांमध्ये उत्साह संचारला होता. रसिकांनी देखिल या गाण्यांना भरभरून असा प्रतिसाद दिला तर काही रसिकांना या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य करण्याचा मोह देखिल आवरता आला नाही.
याप्रसंगी उपमहापौर नागसेन बोरसे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक सुनिल बैसाने, भगवान गवळी, रंगनाथ ठाकरे, माजी नगरसेवक भिकण वराडे, गोपीचंद पाटील, गायक चंद्रकांत शिंदे यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment