सावित्रीमाई फुले अभ्यासिकेचे हे पहिले यश : विठोबा नामदेव माळी अध्यक्ष माळी समाज
धरणगाव प्रतिनिधी -
धरणगांव : धरणगाव शहरातील माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.नुकतीच ११ एप्रिल राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मीटिंग चे आयोजन करण्यात आलेले होते. यावर्षी देखील माळी समाजाच्या वतीने ११ एप्रिलला मोठ्या उत्साहात तात्या साहेबांचा जन्मोत्सव साजरा होणार व विविध स्पर्धांचे आयोजित करण्यात आले आहे.या संदर्भात पंचमंडळाची विस्तृत चर्चा झाली.एक वर्षांपूर्वी ११ एप्रिल च्या दिवशी सावित्रीमाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन केले होते आणि या एक वर्षांमध्ये अभ्यासिकेच्या माध्यमातुन समाजातील विद्यार्थ्यांना यश आलेले आहे ते केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत.
रेल्वे सेवेत रुजु झालेले तरुण भुषण संजय महाजन,डिगंबर भटु महाजन,अमोल कैलास माळी,नरेंद्र रघुनाथ महाजन,अनिल भगवान बडगुजर आणि पोष्ट सेवेत निवड झालेले सचिन रविंद्र माळी, माळी समाजाचे कोषाध्यक्ष यांची कन्यारत्न कु.कल्याणी विनोद माळी यांचा माळी समाजाचा वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
मान्यवर याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी, शिवाजी देशमुख, सचिव - गोपाल माळी, विलास महाजन, कोषाध्यक्ष - व्ही.टी.माळी, समाजाचे विश्वस्त ज्ञानेश्वर भादू महाजन, विजय महाजन, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ साहेब, भारतीय जनता पार्टीचे गटनेते कैलास माळी सर, माळी समाजाचे माजी सचिव दशरथ महाजन, सहसचिव दिगंबर माळी, सुखदेव अण्णा माळी, सल्लागार पंच एच डी माळी, पी डी पाटील, शिवसेनेचे संतोष महाजन, अखिल भारतीय सावता माळी युवक संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश माळी, नितेश महाजन, तिरंगा अकॅडमी चे ट्रेनर निवृत्ती माळी, तरूण वर्ग तसेच माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी तर आभार सचिव गोपाल माळी यांनी मानले.
Post a Comment