देशमुख महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन


 (पाचोरा प्रतिनिधी) : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. एस. डी. भैसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक जयंती-पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील यांनी केले.अभिवादन सभेला इतिहास विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, प्रा. एस. ए. कोळी, प्रा. डी. ए. मस्की, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. एस. भालेराव, ग्रंथपाल प्रा. आर. एम. गजभिये, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.  सचिन हडोळतीकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. अतुल देशमुख, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रवीण देसले, प्रा. प्रदीप वाघ, डॉ. मंजुश्री जाधव, डॉ. गजानन चौधरी, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. मोहनदास महाजन, अजय देशमुख, संदीप केदार, प्रवीण तडवी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments