शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा : येथील माजी नगरसेवक दीपक अहिरे यांच्या आदिवासी समाजातील विविध संस्था व संघटना माध्यमातून करित असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत बुलढाणा येथील भिल्लठाणा येथे महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटना द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन आणि आदिवासी जनजागर मेळावा घेण्यात आला त्यावेळी दिपक अहिरे यांना एकलव्य समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. अनिरुद्ध रामचंद्र गायकवाड, आदिवासी नेते दिलीप श्रीराम मोरे, सिनेट सदस्य नानासाहेब नामदेव गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, आदिवासी विकास विभाग अमरावती उप आयुक्त श्रीमती जागृती कुमरे, तहसीलदार जालना छायाताई पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.आदिवासी समाजाचे नेते दिपक अहिरे यांनी गेल्या वीस वर्षांपासून समाजाला एकत्र करून महाराष्ट्र राज्यातील काणाकोपऱ्यात आपला ठसा उमटविला. विविध प्रकारच्या चर्चासत्र, शिबीर, परिवर्तन सभा, मेळावा ह्या माध्यमातून समाजातील अशिक्षित बांधव व नवतरुणांना एका व्यासपीठावर आणून समाजाला योग्य दिशा देऊन जनजागृती निर्माण केली. भिल समाज एकत्र करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य भिल समाज विकास मंचची स्थापना केली त्या माध्यमातून शिंदखेडा येथे पहिले ऐतिहासिक भिल महासंमेलन यशस्वी करून महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधले. त्यानंतर दुसरे भिल महासंमेलन देवळा सटाणा येथे नुकतेच संपन्न झाले तिथे ही हजारो च्या संख्येने समाज बांधव एकत्र आले. आपल्या अभ्यासु व्यक्तीमत्वाला साजेशी कामगिरी करणाऱ्या दिपक यांनी महाराष्ट्र राज्यात उत्तुंग भरारी घेतली.पुरस्कार वितरण सोहळ्याला सहपत्निक हिराबाई दिपक अहिरे सह दोन्ही मुलांसह भिल समाज विकास मंचचे जिल्हा सचिव अशोक सोनवणे, अनिल ठाकरे, बळीराम निकम, राजेश मालचे, तुळशीराम कोळी, राहुल ठाकरे,कालु मोरे संजय मोरे, अशोक मालचे,करण सोनवणे, भरत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment