क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




(धुळे प्रतिनिधी) धुळे : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांच्या प्रतिमास अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments