धुळे : प्रतिनिधी
धुळे : शहराची ग्रामदेवता असणाऱ्या आई एकवीरा देवीचा रथ चैत्र पौर्णिमेनिमित्त काढण्यात आला.आई एकवीरा देवीची मूर्ती रथामध्ये ठेवत मान्यवरांच्या हस्ते महाआरती करत देवीचा रथ उत्सवाला सुरुवात करण्यात आली.आई एकवीरा देवीच्या मंदिरापासून निघालेला हा रथ शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाला.हा रथ मार्गस्थ होत असताना अनेक भाविकांकडून एकवीरा देवीच्या रथाच ठिकठिकाणी स्वागत करण्यासह पुष्पवृष्टी देखील केली जाते.एकवीरा देवीचा निघालेला रथ हा वाजत गाजत शहरातून मार्गस्थ होत असतो.या रथामध्ये अनेक नागरिकांनी सहभागी होत देवीच्या रथासमोर चांगलाच ठेका धरल्याचं पहावयास मिळाल.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा या एकवीरा देवीच्या रथाला असून यावर्षी देखील मोठ्या थाटामाटात या रथाची मिरवणूक काढण्यात आली. एकवीरा देवी मंदिरापासून निघालेली हि रथाची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होऊन रात्री उशिरापर्यंत एकवीरा देवी मंदिराजवळच या रक्ता मिरवणुकीचा समारोप होत असतो.
याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, आमदार मंजुळा गावित, माजी नगरसेवक कैलास चौधरी, नगरसेवक हिरामण गवळी, युवा सेनेचे पंकज गोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी नगरसेवक गुलाब माळी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment