धुळे प्रतिनिधी) धुळे : महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाचा उद्धार केला असून या बहुजन समाजावर त्यांचे अनंत उपकार आहे असे प्रतिपादन अहमदनगर येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर नागेश गवळी यांनी केले आहे. ते धुळ्यात आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा नाकारत समाजासमोर सत्य आणण्याचे काम फुलेनी त्या काळात केले . म्हणूनच त्यांना सत्यशोधक देखील म्हटले जाते. मात्र अजूनही ओबीसी समाजाला महात्मा फुले अजूनही कळालेच नाहीं म्हणून बौद्ध समाज पुढे येऊन वैचारिक अशी फुलेंची जयंती साजरी करत आहे. हेच खरे परिवर्तन समाजातून अपेक्षित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवरायांची समाधी शोधून शिवरायांची पहिली जयंती साजरी करून शिवरायांवर कुळवाडी भूषण नावाचा पुस्तक लिहून शिवरायांचा विचार पुढे नेण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आहे. मात्र आम्हाला इतिहास दुसराच शिकवला जातो ही शोकांतिका देखील गवळी यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे. महात्मा फुले यांच्या घरावरील 395 नंबर घेऊन संविधान लिहिताना 395 कलम बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांचा सन्मान केला आहे. असं देखील त्यांनी यावेळी नमूद केला आहे. एकंदरीतच गवळी यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.
याप्रसंगी एडवोकेट संतोष जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र लोंढे, एडवोकेट जितेंद्र निळे, प्रभाकर खंडारे, डॉक्टर सुशील महाजन यांच्या सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment