धरणगाव येथील पी.आर.हायस्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन


धरणगाव : येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना १९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे हे होते.त्यांच्या आणि पर्यवेक्षक श्री.कैलास वाघ यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री.बापू शिरसाठ यांनी सत्यशोधक तात्यासाहेब राष्ट्रपिता  महात्मा ज्योतिरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.मुख्याध्यापक डॉ.सोनवणे यांनी सामाजिक परिवर्तनात महात्मा फुले यांच्या समर्पित योगदानावर भाष्य केले. स्त्रियांनी सावित्रीमाईंच्या विचारांचा अंगिकार केला तरच त्यांचं जगणं सुसह्य होईल असे सांगितले.याप्रसंगी शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेशसिंह सूर्यवंशी यांनी तर आभारप्रदर्शन श्री.डी.एच.कोळी यांनी केले.

0/Post a Comment/Comments