(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत ११ एप्रिल - शिक्षण क्रांतीचे आद्य जनक - सत्यशोधक - महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रंगभरण व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही टी माळी यांनी केले.
मुलांनी तात्यासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. यामध्ये रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम - कु. ललिता रोहिदास झेंडे ( ८ वी ब ) , द्वितीय - वैभव राकेश माळी ( ७ वी अ ) , तृतीय - कु.जया मनोज सोनवणे ( ६ वी अ ), वकृत्व स्पर्धांमध्ये प्रथम कु. रुपाली दीपक कुवर ( ९ वी अ ), द्वितीय - कु.चेतना संजय जावरे ( ८ वी ब ), तृतीय - कु साक्षी विनोद माळी ( ८ वी अ ). सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Post a Comment