धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव : येथील मोठा माळी वाडा परिसरातून २१ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद धरणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. धरणगाव शहरातील, मोठा माळी वाडा येथील रहिवासी निलेश सुभाष महाजन (वय २१) हा दिनांक १ एप्रिल, २०२३ ला सकाळी ८ वाजता कोणास काहीही न सांगता घराबाहेर लावलेली बजाज कंपनीची प्लॅटिना, काळ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच.१९ बीयू ५९९२) घेऊन निघून गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही उपयोग झाला नाही. यामुळे वडील सुभाष महाजन रा.मोठा माळी वाडा, यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात मुलगा निलेश हरवल्याची नोंद केली आहे. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्याकडून हरवलेला निलेश कुणाच्या नजरेस अथवा आढळल्यास धरणगाव पो. स्टे. ०२५८८-२५१३३३, पोलिस नाईक मिलिंद सोनार, ९७६५३३९९९७, कृपाराम माळी ९५४५५८३०८४ यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment