(धरणगाव प्रतिनीधी) : धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण रविभाऊ कढरे मागासवर्गीय उपजिल्हा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सर,वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदन पाटील, वाचनालयाचे सचिव
योगेश पी.पाटील,मायाताई देवरे मागासवर्गीय तालुका प्रमुख,राज देवरे,संजय पवार शिवसेना उप तालुका संघटक,अँड संदिप पाटील,कल्पेश महाजन पत्रकार,राजेंद्र पडोळ,अनंत जाधव,नंदकिशोर पाटील,आदित्य योगेश पाटील,किशोर पाटील,राजेंद्र फुलपागर,रघुनंदन वाघ,दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
Post a Comment