भाजप प्रणित सरकारकडून लोकशाहीची पायमल्ली - डॉ. व्ही डी पाटील
देशात काँग्रेस हुकूमशाहीचा एकजुटीने विरोध करणार - सी के पाटील
[ धरणगाव प्रतिनिधी ]
धरणगाव : येथे तालुका काँग्रेस कमिटीने राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई प्रकरणी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत प्रास्ताविकात दिनेश पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान प्रचार प्रसार करीत मोदी सरकारच्या भ्रष्ट व हुकूमशाही विरोधात संसदेत व जनमानसात लढा देऊन सत्य समोर आणले. त्यामुळे मोदी सरकार व भाजपने राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिनेश पाटील म्हणाले. तद्नंतर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुरत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन राहुल गांधी यांचे संसद सदस्य रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि निरव मोदी, ललित मोदी हे ओबीसी नसून, ओबीसी असल्याचे खोटे भासवून ओबीसी बांधवांचा अपमान करून, उलट खोटे आरोप करून भाजपच आंदोलन करीत आहे. अशा हुकुमशाहा बनलेले केंद्रातील मोदी सरकार म्हणजेच 'गंगाधर हाच शक्तिमान आहे.' देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी हुतात्म्य पत्करले, त्याचप्रमाणे आमच्यावर जरी गोळ्या घातल्या तरी आम्ही लोकशाहीच्या बाजूने लढणार असल्याचे प्रतिपादन श्री. देशमुख यांनी केले.
यानंतर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद पाटील यांनी भाजप व केंद्र सरकारकडून लोकशाहीची पायमल्ली, जाती-धर्मात तेढ, सत्तेचा दुरुपयोग होत असून सर्व सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची उघडपणे लुट करत आहे. अदानी सारख्या कर्ज बुडव्यांना संरक्षण देत आहे. सद्या देशात चोराला चोर म्हणणे गुन्हा ठरत असून उलट चोरच शिरजोर होत आहे. अशाच एका जुन्या प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावतांना न्यायालयाने त्यांना एका महिन्यात अपील करण्याची संधी दिली असताना वरीष्ठ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता दबावतंत्राचा वापर करून २४ तासाच्या आत राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य पदावरून निष्कासन केले. नव्हे तर त्यांना शासकीय बंगला खाली करण्याची सुचना सुद्धा दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या महीण्याभराची प्रतिक्षा न करता भाजपच्या मोदी सरकारला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विरुध्द कारवाई करण्यासाठी एवढी घाई कां सुटली? अशीच घाई मग महागाई कमी करण्यासाठी, युवकांना रोजगार देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांनाआर्थिक मदतीसाठी, मोदी सरकार का करत नाही. आणि यापूर्वीही काही संसद सदस्यांवर गंभीर आरोप झाले असताना आजही ते सरकारी बंगल्यामध्ये राहत आहेत, मग राहुल गांधींनाच बंगला खाली करण्याची एवढ्या तातडीने नोटीस देण्याची घाई का, असा प्रश्न प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
यानंतर ज्येष्ठ नेते सी के पाटील यांनी भाजप व केंद्र शासनाची कृती देशाला विघातककडे नेणारी असुन जनतेच्या विश्वासाला तडा पोहोचवणारी आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा जनतेला भविष्यात धोका होवु नये म्हणुन जनतेनी वेळीच सावध व्हावे. हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून, केंद्र शासनाविरुध्द जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी व लोकशाहीचे रक्षण करण्याकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातल्या कानाकोप-यात जय भारत सत्याग्रहाचा शुभारंभ केला जात आहे. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात सुंदर असलेल्या भारतीय राज्यघटनेची हत्या भाजप सरकार करीत आहे. भाजप व सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही विरोधात शासन यंत्रणेचा दुरुपयोग करुन कुंभाड रचत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. हुकुमशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणत असतांना राहुल गांधी यांनी स्विकारलेला आक्रमकपणामूळे भविष्यात भाजपाला धोका होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेवुन राहुलजी गांधी यांचे विरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करण्याचे कारस्थान मोदी सरकारने चालविले असून याच हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेस पक्षातर्फे सर्वत्र निषेध करण्यात येत असून याला देशातील राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील समस्त जनतेचा पाठिंबा मिळत असून राहुल गांधी यांच्या पाठीमागे सारा देश उभा असल्याचे सी के पाटील यांनी सांगितले.
शेवटी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ व्ही डी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिक्षण बाबतीत माहिती अधिकारात माहिती मागविली असता प्रधानमंत्री मोदींची माहिती मिळणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. याचा अर्थ देशात शासनाला जाब विचारणारा देशद्रोही ठरत आहे. परवा दिवशीच न्यायव्यवस्थेने सरकारवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांना जेल झाल्यास गावागावात निषेध जनआंदोलन उभारुन काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि जेलभरो आंदोलन शिवाय स्वस्त राहणार नाही. आणि याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र व राज्य सरकारवर राहील असे मत डॉ.पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र माळी यांनी तर, योगेश येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. आयोजित पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस बाबा देशमुख, प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. व्ही डी पाटील, जेष्ठ नेते सुरेश भागवत, सी के पाटील, रतीलाल चौधरी, प्रा.सम्राट परिहार, दिनेश पाटील, विजय जनकवार, सलीम चौधरी, अनंत परिहार, रामचंद्र माळी, सुनील बडगुजर, नंदा महाजन, योगेश येवले, गौरव देशमुख आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment