तालुका भूमी अभिलेख व महसूल विभागाला दिले चौकशीचे आदेश
(साक्री प्रतिनिधी ) : साक्री तालुक्यातील मौजे शिवाजी नगर ता.साक्री जि.धुळे येथील जागतिक स्तरावर नाव असलेल्या महाजनकोचा (गोदरेंज) सौर ऊर्जा प्रकल्पात शिवाजीनगर येथील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेलेल्या आहेत किंवा अधि गृहीत केलेल्या आहेत अशा शेतजमिनी त्या संबंधित शेतकऱ्यांना कसण्यासाठी म्हणजेच शेती करण्यासाठी परत मिळाव्यात या विषयावर गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करीत असलेले दहा ते बारा शेतकरी आज साक्री तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा धुळे याच्या उपस्थितीत व महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी महसूलचे वरिष्ठ अधिकारी साक्रीचा प्रभारी तहसीलदार गांगुर्डे मॅडम व अप्पर तहसीलदार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब व सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव महिला बगीनी तसेच भूमि अभिलेखचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सामूहिक बैठक बोलावून शिवाजी नगर शेती गट क्रमांक 128 मधील शेती व ती शेत जमीन कसणारे शेतकरी या सर्वांसोबत सविस्तर चर्चा करून आजच्या आज मार्ग काढून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देऊ असे लेखी आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले. व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ व कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ असे आश्वासन यावेळी दिले तसेच त्यांना कुठल्याही शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नये व त्यांना घरकुल योजने अंतर्गत घर उपलब्ध करून द्यावी तसेच शेती विषयक इतर विविध योजनांचा लाभ मिळून द्यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदारांना दिल्या. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रहार संघटनेचे पदअधिकारी श्री.नानाभाऊ शेलार वर्धाणे यांनी शेतकऱ्याचे प्रश्न व त्यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनाच्या चुका व संबंधित प्रकल्पाचा अधिकाऱ्यांच्या चुका जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या.शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आम्ही प्रकल्पाच्या विरोध करणार नाही असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीविषयक लढ्याला अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय मिळून दिला त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment