रावेर तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा

 


रावेर  येथील तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम, ग्राहक संघटनेचे कार्यकर्ते विनोद चौधरी  सहा .पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, प्रशिक्षणार्थी तहसिलदार डाॅ . मयुर कळसे यांनी उपस्थितांना ग्राहक संरक्षण कायद्या बाबतचा ईतिहास व त्याचे बदलते स्वरुप तसेच ग्राहक हक्कांविषयी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे , ग्राहक संघटनेचे सुनिल महाजन, बाळु पाटील पुरवठा निरीक्षक डि. के . पाटील सह . ग्राहक नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक नगरे यांनी केले आभार नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केले .

0/Post a Comment/Comments