मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 96 वर्षांपूर्वी छ. शिवरायांच्या स्वराज्य राजधानी च्या कुशीतील महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पेटवून,सर्व सजीवांप्रमाणे अस्पृश्य जाती जमातींनाही सार्वजनिक पाण वठ्यावर वापर वहिवाटीचा अधिकार आहे. या क्रांतीच्या समानतेची ज्योत पेटवून उभारलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या म. ज्योतिराव फुले, छ.शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी गेल्या वीस मार्च दोन हजार आठ रोजी एड. मनोहर खैरनार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याच दिवशी पंधरा वर्षांपूर्वी प्रवर्तन चौकाची निर्मिती करून छ. शाहू महाराज म. ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची स्थापना केली आहे. म्हणून ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वभौम भारतातील प्रत्येक नागरिकाला व सजीवाला त्यांच्या अधिकाराचं जीवन व नैसर्गिक साधन संपत्ती वरील वापराचे समान अधिकार बहाल करण्यासाठी व अनाठाई अनिष्ट रूढी परंपरांचा त्याग करण्यासाठी छ. शाहू महाराज यांच्या मदतीने या समतेच्या लढ्याची सुरुवात करून आज तगायत भारतात अस्तित्वात असलेली लोकशाही चे बीज शहाण्णव वर्षांपूर्वी छ. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाड येथील प्रसिद्ध तळ्याचे पाणी आपल्या शेकडो अनुयायांसह प्राशन करून आपल्या अधिकारांची मुहूर्तमेढ केली. ही स्मृति/आठवण जागृत ठेवण्यासाठी मुक्ताईनगर येथे याच दिवशी पंधरा वर्षांपूर्वी प्रवर्तन चौकाची निर्मिती झाली आहे. म्हणून आज वीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता चे सुमारास एड.मनोहर खैरनार,रवींद्र पोहेकर,लीलाधर भालेराव,विठ्ठल सोनवणे,पुना श्यामा इंगळे, क्षितिज खैरनार,कुमारी रेवती खैरनार,शंतनू भालेराव, सौ जया खैरनार,सौ वैशाली भालेराव, वल्लभ चौधरी,नंदू जाधव,सौ.अनिता खैरनार, धनराज सापधरे,समाधान तायडे, रवींद्र तायडे,समाधान रायपुरे, रमेश बोदडे,जितेंद्र बोदडे,गोकुळ पोहेकर,इत्यादी समाज बांधवांनी या समतेच्या सत्त्याग्रह सोहळ्याच्या आठवणी जागृत करणाऱ्या कार्यक्रमास प्राधान्याने उपस्थिती दिली.
Post a Comment